पर्यावरण विषयक जनजागृतीसाठी अभिनव संकल्पना हव्या आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने पर्यावरण विषयक जनजागृती व नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धनासाठी व्यक्ति व संस्थांकडून अभिनव संकल्पना मागविल्या आहेत. प्रकल्पाचे स्वरुप, क्षेत्र व राबविणार्‍या संस्थेची आर्थिक क्षमता यावर राज्य शासन संपुर्ण किंवा अंशत: अनुदान देऊ शकते. या योजनेसाठी खालील विषय दिले आहेत. सामाजिक संस्थांसोबतच, शैक्षणिक, सहकारी व शासकीय संस्था, कंपन्या तसेच व्यक्ति यांना या योजनेकरिता प्रस्ताव पाठविता येतील.


गट अ: जनजागृती कार्यक्रम
शहरी, ग्रामीण, तटीय़ व पश्चिम घाट क्षेत्रासह आदिवासी क्षेत्रातील पर्यावरणीय समस्यांशी निगडीत लोकसहभाग असलेले जनजागृती कार्यक्रम जसे स्थानिक पर्यावरणीय समस्या, जल प्रदूषण, पर्यावरणपूरक सण, पाणी बचत, घन कचरा व्यवस्थापन, जैवविविधता व तटीय संवर्धन या उद्दिष्टांवर आधारित कार्यक्रम.


गट ब: प्रकल्प (प्रत्यक्ष अंमलबजावणी)
नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन, संरक्षण आणि व्यवस्थापन, सागरी, जलीय व पश्चिम घाट जैवविविधता, भुजल प्रभारण, घन कचरा व्यवस्थापन, स्थानिक पर्यावरण सुधारणा, इको व्हिलेज, पर्यावरणावर आधारित जीवनशैली असलेल्या समाजाकरिता स्थायी उपाययोजना, उर्जा संवर्धन, इत्यादी स्थानिक लोकसहभागाचे प्रकल्प.

वरील कार्यक्रम / प्रकल्प उदाहरणादाखल आहेत. या व्यतिरिक्त अन्य अभिनव परंतु अशाच स्वरुपाचे प्रकल्प स्वीकारले जातील. प्रस्तावांची निवड प्रकल्पाचे नाविन्य, फलनिष्पत्ती, स्वयंसिद्धता, इतरत्र अनुकरण क्षमता व योजनेचे कार्यक्षेत्र (शहरी/ग्रामीण/आदिवासी) या निकषांवर केली जाईल.

योजनेची सविस्तर माहिती, प्रवेश अर्जाचा नमुना envis.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी आपले प्रस्ताव विहित नमुन्यात पोस्टाने किंवा envis.maharashtra@gmail.com या पत्त्यावर इमेल करावेत.

0 प्रतिक्रिया:

Post a Comment