फोर्ड मोटार या जगप्रसिद्ध कंपनीतर्फे आंतरराष्ट्रीय फेलोशीप

फोर्ड मोटार कंपनी या जगप्रसिद्ध कंपनीतर्फे ९२ स्ट्रीट वाय या ज्यूईश समुहाच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय फेलोशीपसाठी भारत, ब्राझील, इंडोनेशिया, इज्राएल, टर्की, युक्रेन व व्हेनेझुएला या देशांच्या नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही फेलोशीप वर्ष २०११ करीता आहे. इच्छुकांसाठी खालील निकष आहेत.

१. स्वयंसेवी संस्थेशी व्यवसायिकरित्या किंवा कार्यकर्ता म्हणून संबंधित असावा.
२. सामाजिक प्रश्नांची आपल्या कामाद्वारे यशस्वी उकल करणारे
३. न्यूयॉर्क येथील ३ आठवड्याच्या स्वयंसेवी संस्थेचे व्यवस्थापन या प्रशिक्षणाचा उपयोग होईल अशी व्यक्ती.

२ ते २२ जून २०११ या कालावधीत अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात हे प्रशिक्षण पार पडेल. या फेलोशीप अंतर्गत विमान भाडे, निवास, भोजन, प्रवास व कार्यक्रम संबंधित खर्च आयोजक संस्थेद्वारे केला जाईल. तसेच प्रशिक्षणार्थींना विद्यावेतनही देण्यात येईल. प्रशिक्षणा दरम्यान प्रशिक्षणार्थींना न्यूयॉर्क शहरातील आदर्श स्वयंसेवी संस्थांना तसेच सामाजिक, शैक्षणिक व व्यवसायिक क्षेत्रातील मान्यवरांना भेटण्याची संधी मिळेल.

अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख ३० जून २०१० आहे. अर्जदाराचे किमान वय २१ वर्षे असावे.

अधिक माहिती या संकेतस्थळावर पाहता येईल. तसेच अर्ज व माहिती पत्रक येथून उतरवता (डाऊनलोड करता) येईल.

0 प्रतिक्रिया:

Post a Comment