फुलब्राईट-नेहरु फेलोशीप

युनायटेड स्टेट्स - इंडिया एज्युकेशनल फाऊंडेशनतर्फे फुलब्राईट-नेहरु डॉक्टरल व प्रोफेशनल रिसर्च फेलोशीप करीता भारतीय शैक्षणिक संस्थांमध्ये पीएचडीसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी तसेच विशेष अनुभव व कार्य संपादन प्राप्त व्यक्तिंकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

सर्व क्षेत्रातील व्यक्तिंकडुन जरी अर्ज स्विकारण्यात येणार असले तरी पुढील विषयांना प्राधान्य दिले जाईल. कृषी विज्ञान, अर्थकारण, शिक्षण, उर्जा, शाश्वत विकास व हवामान बदल, पर्यावरण, आंतरराष्ट्रीय संबंध, व्यवस्थापन व नेतृत्त्व विकास, माध्यम व संज्ञापन : सार्वजनिक सेवा प्रसारणाच्या संदर्भात, लोक प्रशासन, सार्वजनिक आरोग्य, विज्ञान व तंत्रज्ञान याच बरोबर अन्य विषयही आहेत.

या फेलोशीप अंतर्गत अमेरिकी सरकारच्या धोरणानुसार मासिक विद्यावेतन, येण्या-जाण्याचे साधारण वर्गाचे विमान तिकिट, बाध्य भत्ते व संलग्नता शुल्क (लागू असल्यास), अपघात व आजारपणाच्या खर्चाची तरतूद आहे. निवडलेल्या उमेदवारास अमेरिकेमध्ये संबंधित विषयात संशोधन करण्याची व कार्य अनुभव प्राप्त करण्याची संधी मिळेल.

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ जुलै २०१० आहे.
वयोमर्यादा: शक्यतो ४५ किंवा त्यापेक्षा कमी

पात्रता निकष व अधिक माहितीसाठी संस्थेच्या संकेतस्थळास येथे भेट द्या.

0 प्रतिक्रिया:

Post a Comment