इग्नु तर्फे सहभागात्मक विकास विषयावरील पदवी पश्चात अभ्यासक्रम

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (इग्नु) नुकतेच सहभागात्मक विकास (Participatory Development) या विषयावरचे विविध पदवी पश्चात अभ्यासक्रम जाहिर केले आहेत. हे अभ्यासक्रम सोसायटी फॉर पार्टिसिपेटरी रिसर्च इन एशिया या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्यातून सुरु केले आहेत. इग्नुच्या विस्तार शिक्षण केंद्रातर्फे हे अभ्यासक्रम सादर करण्यात आले असून सदर अभ्यासक्रम विविध शासकीय विकास संस्था, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था व एकुणच सेवा क्षेत्रामध्ये भवितव्य घडवू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी तयार केले आहेत. या अभ्यासक्रमासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कुठल्याही विषयातील पदवी परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

हा अभ्यासक्रम पदव्युत्तर प्रमाणपत्र (पीजी सर्टिफिकेट), पदव्युत्तर पदविका (पीजी डिप्लोमा), प्रगत पदव्युत्तर पदविका (अ‍ॅडव्हान्स्ड पीजी डिप्लोमा) व पदव्युत्तर पदवी (एम.ए.) अशा चार स्तरांवर उपलब्ध आहे. पहिले सत्र यशस्वीरीत्या पुर्ण करणारे विद्यार्थी पदव्युत्तर प्रमाणपत्रासाठी पात्र ठरतील. दुसरे सत्र पुर्ण करणार्‍या चिद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदविका बहाल करण्यात येईल. अशाच पद्धतीने तिसरे व चौथे सत्र पुर्ण करणारे विद्यार्थी अनुक्रमे प्रगत पदव्युत्तर पदविका व पदव्युत्तर पदवी प्राप्त करतील.

हा अभ्यासक्रम दूरस्थ पद्धतीने उपलब्ध असला तरी पदव्युत्तर पदविका व पदव्युत्तर पदवी या दोन सत्रांमध्ये प्रत्येकी दोन ते तीन आठवडे प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात नेमणूक केली जाणार आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०१० आहे. अधिक माहितीसाठी इग्नुच्या मुंबई स्थित प्रादेशिक केंद्राशी संपर्क साधावा. तसेच पीआरआयए या संकेतस्थळावर विस्तृत तपशील उपलब्ध आहे.

0 प्रतिक्रिया:

Post a Comment