सर रतन टाटा ट्रस्ट मध्ये नोकरीच्या संधी

मुंबई स्थित सर रतन टाटा ट्रस्ट ही भारतातील सर्वात जून्या स्वयंसेवी संस्थेपैकी एक व अत्यंत सुप्रतिष्ठित संस्था आहे. ट्रस्ट तर्फे ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य, सुशासन, कला व संस्कृती संवर्धन इत्यादी उपक्रमांना सहाय्य केले जाते. या संस्थेत नोकरीच्या खालील संधी उपलब्ध आहेत.

  • कार्यक्रम अधिकारी - जिल्हा उपक्रम - पुर्व प्राथमिक शिक्षण (SRTT/PO/DI/2010/NP)
  • कार्यक्रम अधिकारी - पुर्व प्राथमिक शिक्षण  (SRTT/PO/ElEd/2010/NP)
          कार्यस्थान: मुंबई
          अंतिम दिनांक: १५ जून २०१०

  • समूह प्रमुख / कार्यक्रम सहाय्यक - जिल्हा उपक्रम - पुर्व प्राथमिक शिक्षण (SRTT/TL/PA/DI/2010/NP)
          कार्यस्थान: नंदूरबार
          अंतिम दिनांक: १० जून २०१०

पात्रता:
  1. शिक्षण / बाल किंवा मानव विकास / अन्य अनुरुप शाखेतील स्नातकोत्तर पदवी
  2. पुर्व प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी विविध माध्यमं व साधनांच्या संकल्पन व अंमलबजावणीतील किमान ३ ते ५ वर्षांचा अनुभव.
  3. आव्हानात्मक परिस्थितीमध्ये काम करण्याची तयारी व नवसंकल्पानांचा वापर करुन भावी धोरणे ठरविण्याची क्षमता
  4. मोठ्या प्रमाणात प्रवास करण्याची तयारी

मुंबई करीता अर्ज करणार्‍या उमेदवारांनी आपल्या स्वपरिचयपत्रा सोबत "जिल्हा पातळीवरील पुर्व प्राथमिक शिक्षणातील प्रमुख आव्हाने व ते (उमेदवार) ट्रस्ट्च्या पुर्व प्राथमिक विभागास कशी बळकटी देऊ शकतात" या विषयावर एक पानी टिपण पाठवावे.

नंदुरबार करीता अर्ज करणार्‍या उमेदवारांनी "नंदुरबार मधील पातळीवरील पुर्व प्राथमिक शिक्षणातील प्रमुख आव्हाने व ते (उमेदवार) ट्रस्ट्च्या पुर्व प्राथमिक विभागास कशी बळकटी देऊ शकतात" या विषयावर एक पानी टिपण पाठवावे.


उमेदवारी अर्ज पाठविण्याचा पत्ता: srttrecruit@tata.com


अधिक तपशील संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

0 प्रतिक्रिया:

Post a Comment