सोस्वातर्फे स्वयंसेवी संस्थांसाठी क्षमतावर्धन कार्यशाळा

सोस्वा ट्रेनिंग अ‍ॅन्ड प्रमोशन इंस्टिट्यूट या पुणे स्थित स्वयंसेवी संस्थांच्या सुदृढीकरणासाठी काम करणार्‍या संस्थेतर्फे 'स्वयंसेवी संस्थांचे क्षमता वर्धन' या विषयावर दिनांक १२ ते १४ जुलै २०१० दरम्यान तीन दिवसीय निवासी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत खालील विषयांवर तज्ञ व्यक्तिंकडून मार्गदर्शन केले जाईल.

 • स्वयंसेवी संस्थांपुढील आव्हाने
 • नेटवर्किंगचे महत्व व सुरुवात
 • सुशासन, पारदर्शिता व जवाबदारी
 • स्वयंसेवी संस्थांसंबंधित कायदेशीर बाबी
 • मुंबई सार्वजनिक न्यास कायदा-१९५०, सोसायटी नोंदणी कायदा-१८६०, कंपनी कायदा, आयकर कायदा, १२ ए अंतर्गत नोंदणी; ८० जी, ३५ एसी व एफसीआरए अंतर्गत सवलत.
 • विश्वस्तांची तसेच नियामक मंडळ सदस्यांची भुमिका व जवाबदारी
 • स्वयंसेवी संस्थांमधील नियमन व नेटवर्कींग
 • संसाधनांची जमवाजमव: संक्षिप्त अवलोकन, निधी संकलनाची नैतिक तत्वे
 • प्रकल्प प्रस्ताव लेखन, देखरेख व अवलोकन
 • उत्तम वार्षिक अहवाल कसा लिहावा
 • स्वयंसेवी संस्था व्यवस्थापनात संवादाचे महत्त्व
 • हिशोब, लेखा परिक्षण व आर्थिक तरतुदी

स्थान:
सोस्वा ट्रेनिंग अ‍ॅन्ड प्रमोशन इंस्टिट्यूट,
म्हाडा व्यापारी संकुल, पहिला माळा,
एमएचबी वसाहत, येरवडा, पुणे - ४११ ००६.

वेळ: तीनही दिवस स.९.३० ते सा.६.००
शुल्क: रु.१०००/- प्रति सहभागी (निवास व भोजनासहित)
अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक: ०२०-२६६८४६४१ / २६६९६२१२ / २६६८७९०० वर संपर्क साधावा.

नोंदणी केवळ फॅक्स किंवा इमेल द्वारेच होईल.
इमेल: stapi@vsnl.net किंवा society_2007@dataone.in
फॅक्स: ०२०-२६६९५६४६

0 प्रतिक्रिया:

Post a Comment