राज्य शासनातर्फे वनश्री पुरस्कारांसाठी आवाहन

सामाजिक वनीकरण संचलनालयातर्फे वनेतर क्षेत्रातील वृक्षारोपण व संवर्धन यामध्ये उत्कृष्ट कामगीरी करणाया व्यक्ति व संस्थांना सन्मानित करण्यासाठी दरवर्षी 'महाराष्ट्र राज्य वनश्री पुरस्कार' देण्यात येतो. वर्ष २००९ च्या पुरस्कारासाठी संचलनालयाकडून नामांकने मागविण्यात येत आहेत. हा पुरस्कार १.व्यक्ति २.ग्रामपंचायत ३. शैक्षणिक संस्था ४.सेवाभावी संस्था व ५.ग्राम/विभाग/जिल्हा या पाच संवर्गात देण्यात येतो. तसेच हा पुरस्कार राज्य व महसुल विभाग अशा दोन स्तरांवर दिला जातो.
महसूल विभागस्तरावर प्रत्येक संवर्गामध्ये प्रथम व द्वितिय असे अनुक्रमे रु.२५,०००/- व रु.१५,०००/- रुपयांचे दोन पुरस्कार प्रदान केले जातील तर राज्य स्तरावर प्रत्येक संवर्गामध्ये प्रथम, द्वितिय व तृतीय असे अनुक्रमे रु.५०,०००/-, रु.४०,०००/- व रु.३०,०००/- रुपयांचे तीन पुरस्कार प्रदान केले जातील.

वृक्षलागवड कार्यात ग्रामीण दुर्बल घटकांचा व महिलांचा सहभाग व त्यायोगे ग्रामीण अर्थव्यवस्थेत झालेली सुधारणा किंवा अपारंपरिक उर्जा स्त्रोतांचा वापर करण्यासाठी जनतेला प्रोत्साहित करण्यासाठी केलेले कार्य अशा व अन्य मुद्यांचा मुल्यमापनात निकष म्हणून विचार केला जाईल.  किमान मागील ३ वर्षे वृक्षारोपण व संवर्धनाच्या क्षेत्रात कार्यरत असणे आवश्यक आहे. दिनांक ३१ डिसेंबर २००९ अखेर केलेल्या कार्याच्या आधारे यावर्षीचा पुरस्कार देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.

या पुरस्कारासाठी अर्ज करु इच्छिणार्‍यांनी आपल्या जिल्ह्याचे उपसंचालक, सामाजिक वनीकरण विभाग यांच्याशी संपर्क साधून माहिती व नमुना अर्ज प्राप्त करुन घ्यावा. अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०१० आहे. अधिक माहितीसाठी प्रसिद्धी अधिकारी श्री. ए.एम. पाटील यांच्याशी दूरध्वनी क्रमांक ०२०-२६१२ ९४३४ वर संपर्क साधावा.

0 प्रतिक्रिया:

Post a Comment