महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे स्वारस्याच्या अभिव्यक्तीसाठी आमंत्रण

महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे. माविम, इंटरनॅशन फंड फॉर अग्रीकल्चरल डेव्हलपमेंटच्या आर्थिक सहकार्याने बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे.  महिलांच्या सक्षमीकरणासाठी माविम महाराष्ट्राच्या ३४ जिल्ह्यांमध्ये 'तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला विकास कार्यक्रम' राबवित आहे. महामंडळाने आतापर्यंत महिला सरपंचांच्या क्षमता वर्धनासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम केले आहेत.
सरपंच म्हणून जबाबदारी निभावताना येणार्‍या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी माविमच्या कार्यक्षेत्रात पंचायती राज संस्थांचा व स्थानिक प्रशासनीय समस्यांचा अभ्यास करण्यासाठी महामंडळ अशा प्रकारच्या कामाचा अनुभव असलेल्या संस्थांकडून स्वारस्याची अभिव्यक्ती मागवित आहे. 
इच्छुक संस्थां खालील निकष पुर्ण करणार्‍या हव्या:
  1. किमान तीन वर्षे नोंदणीकृत असलेल्या.
  2. सामाजिक विकासा संबंधी गुणवत्तापुर्ण संशोधनाचा अनुभव व पंचायती राज संस्थे संदर्भात सुशासनाच्या संबंधी समस्यांची जाणीव असावी.
  3. विश्लेषणात्मक कामाचा अनुभव आवश्यक.
  4. अभ्यास व विश्लेषण करण्यासाठी संस्थेकडे तज्ञ व्यक्ति व संशोधन विभाग उपलब्ध असणे आवश्यक.
अशा प्रकारच्या संशोधन कार्याचा अनुभव असलेल्या संस्थांना प्राधान्य दिले जाईल. इच्छुक संस्थांनी त्यांचे प्रस्ताव दि. १५ जून २०१० पर्यंत माविम कार्यालयात सादर करावेत. अधिक माहितीकरीता मंडळाच्या मुंबई स्थित मुख्य कार्यालयात संपर्क साधावा. दूरध्वनी क्र.:०२२-२६५९१२१३

0 प्रतिक्रिया:

Post a Comment