डब्ल्युडब्ल्युएफ़ तर्फे संवर्धन संशोधन व कृती प्रकल्पांसाठी लघुनिधी उपलब्ध

वन्यजीव संरक्षण व पर्यावरण संवर्धन या क्षेत्रातील अग्रेसर संस्था डब्ल्युडब्ल्युएफ़ तर्फे संवर्धन विषयात संशोधन करण्यासाठी किंवा प्रत्यक्ष संवर्धन कृती प्रकल्प हाती घेण्यास इच्छुक व्यक्तींसाठी स्मॉल ग्राण्ट्स प्रोग्राम अंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंत निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. खालील विषयांत लघु कालावधीचा कृती प्रकल्प राबवू इच्छिणार्‍या किंवा संशोधनास उत्सुक असणाया व्यक्तिंना प्रोत्साहित केले जाईल.
 1. प्रजाती व अधिवास संदर्भातील समस्या व चिंता - नजिकच्या काळातील धोके (उदा. गिधाडांचे संवर्धन)
 2. स्थानिक पर्यावरणीय समस्यांवर तोडगा काढण्यासाठी लोकांचा व संबंधित घटकांचा सहभाग वाढविणे
 3. संवर्धन व नैसर्गिक संसाधनांच्या व्यवस्थापनातून स्थानीय जनजीवनाचा स्तर वाढविणे किंवा जैवविविधतेवर हानीकारक परिणाम कमी करणार्‍या जीवनशैलीला प्रोत्साहन देणे.
 4. वन्यजीवांच्या संदर्भातील व्यवसायांची अंगे.
 5. कमी ज्ञात असलेल्या किंवा अभ्यासलेल्या वन्य प्रजातींच्या स्थितीबद्दल जागरुकता निर्माण करणे.
 6. पर्यावरणीय समस्यांवर जागरुकता निर्माण करण्यासाठी अभिनव कल्पनांचा उपयोग.
 7. संवर्धनाच्या परिणामांसंदर्भातील वैयक्तिक अथवा सामुहिक कृती दर्शविणे.

आवेदनकर्त्यास संबंधित विषय अथावा भौगोलिक परिसराचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे. प्रकल्पाचा कालावधी ६ ते १२ महिन्यांपर्यंत असावा. तसेच त्याचा आवाका इतकाच असावा की त्यासाठी येणारा खर्च संपुर्णपणे किंवा अधिकतम सदर निधितूनच केला जावा. निवडलेल्या व्यक्तिंना हा निधी तीन ट्प्प्यांमध्ये उपलब्ध करुन दिला जाईल.

पात्रता निकष:
 • विषय डब्ल्युडब्ल्युएफ़ च्या ध्येय कार्यात भर घालणारा हवा. डब्ल्युडब्ल्युएफ़ च्या प्राधान्य क्षेत्रातील प्रकल्पांना प्राधान्य दिले जाईल.
 • कार्यकालावधीमध्ये सुस्पष्ट परिणाम साध्य करणारा प्रकल्प, जो अनुकरणीय व क्षमता वर्धनास पात्र असेल.
 • नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन व संवर्धनामध्ये लोकसहभागाला प्रोत्साहन देणारा प्रकल्प.
 • अभिनव मार्गांचा अंतर्भाव असणारा प्रकल्प जो संसाधनाचे प्रभाव दाखवेल.
 • प्रकल्पाची अत्यावश्यकता व गरज याची स्पष्ट व तर्कशुद्ध मांडणी.

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ जून २०१० आहे. अर्ज व अन्य तपशीलासाठी डब्ल्युडब्ल्युएफ़ च्या संकेतस्थळास भेट द्या.

टीप: मराठी भाषांतरामुळे काही बाबतीत नेमका अर्थबोध न होण्याची शक्यता असू शकते कृपया संबंधित संकेतस्थळावरील माहिती प्रमाण मानावी.

0 प्रतिक्रिया:

Post a Comment