जपान वॉटर फोरमतर्फे पाणी व स्वच्छता प्रकल्पांसाठी लघुनिधी

जपान वॉटर फोरम ही टोकियो स्थित पाणी विषयात काम करणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. या संस्थेतर्फे विकसनशील देशांमधील पाणी व स्वछतेची समस्या सोडवण्यासाठी एखादा प्रकल्प हाती घेऊ इच्छिणार्‍या संस्थांना अर्थसहाय्य केले जाते. या वर्षीच्या निधीसाठी संस्थेने अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे. खालील कार्य / प्रकल्प या निधी अंतर्गत करणे अपेक्षित आहे.

  • वर्षाजल संचय टाक्या, तळी वा विहिरींचे बांधकाम
  • लहान स्तरावरील पाणी पुरवठा योजनेचा विकास
  • नवीन शौचालयांचे बांधकाम व वर्तमान स्वच्छता सुविधा अद्ययावत करणे.
  • पाण्यासंदर्भातील संकटांना रोखणे.
  • पाणी बचतीच्या जल संधारण पद्धतींची स्थापना करणे व त्यास प्रोत्साहन देणे.
  • पाणी व स्वच्छता विषयातील सामाजिक रुढी/समस्या सोडविणे.
  • जलीय पर्यावरणाचे पुनर्स्थापन व संवर्धन करणे.

प्रस्तावित प्रकल्पामध्ये क्षमता वर्धन व जाणीव जागृती कार्यक्रम करणे सुद्धा अपेक्षित आहे, परंतु केवळ क्षमता वर्धन व जाणीव जागृती कार्यक्रमांचा अर्थसहाय्यासाठी विचार केला जाणार नाही.

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०१० आहे. अधिक माहितीसाठी jwffund@waterforum.jp या पत्त्यावर इमेल करु शकता. तसेच अर्ज करण्याआधी संस्थेच्या संकेतस्थळास भेट देऊन मार्गदर्शिका वाचावी.

0 प्रतिक्रिया:

Post a Comment