सांस्कृतिक क्षेत्रात काम करणार्‍या संस्थांना राज्य शासनाने अनुदान

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने सांस्कृतिक क्षेत्रात काम करणार्‍या अव्यवसायिक संस्थांना विशेष उपक्रम किंवा साधन सामुग्री खरेदी करण्यासाठी अनुदान उपलब्ध केले आहे. नाटक, संगीत, नृत्य, तमाशा, नकला, कठपुतळीचे खेळ, लोककला, इत्यादी सारख्या सांस्कृतिक कार्यक्रम व कलांच्या विकासासाठी काम करणार्‍या संस्थां या सहाय्यक अनुदानास पात्र असतील. संस्थेने मागील तीन वर्षांत मिळविलेले उल्लेखनीय यश, ज्यासाठी अनुदान मागितले आहे त्या उपक्रमाची नावीन्यता व परिमाणकारकता तसेच लेखा परिक्षकांचे निरिक्षण इत्यादी बाबींवर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात येईल.
अर्जाचा नमुना व तपशीलवार माहिती राज्य शासनाच्या संकेतस्थळावर इथून उतरविता येईल. तसेच ०२२-२२८४२६३४ किंवा २२०४३५५० या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून माहिती मिळविता येईल. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०१० आहे.

0 प्रतिक्रिया:

Post a Comment