राष्ट्रीय पर्यावरण जागृती मोहिमेत सामील होण्यासाठी बाएफकडे अर्ज पाठवा

केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने नोव्हेंबर २०१० ते मार्च २०११ पर्यंत चालणार्‍या राष्ट्रीय पर्यावरण जागृती मोहिमेचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला आहे. महाराष्ट्र, गोवा व दादरा नगर हवेली या राज्यांसाठी बाएफ रिसर्च फाऊंडेशन या संस्थेची प्रादेशिक स्त्रोत संस्था म्हणून निवड केली आहे. या वर्षीची मोहिम "जैव विविधतेचे जतन" या संकल्पनेवर आधारित असेल. त्या अनुषंगाने खालील विषयांवर प्रस्ताव अपेक्षित आहेत.

  • पाणथळ जमिनीचे संरक्षण
  • दुर्मिळ स्थानिक व औषधी वनस्पतींची लागवड व जतन
  • सामाजिक सहभागातून जैव विविधतेचे जतन
  • जैव विविधता व प्रदूषण नियंत्रण
स्वयंसेवी संस्थांसोबतच शैक्षणिक व शासकीय संस्था सुद्धा या मोहिमेत सामील होऊ शकतात. निवडलेल्या संस्थांना मंत्रालयाकडून कार्यक्रम राबविण्यासाठी १० ते ३० हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणार्‍या संस्थांसाठी बाएफतर्फे राज्यात विभागवार कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या कार्यशाळांचा तपशील खालील प्रमाणे आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २० ऑगस्ट २०१० आहे

दिनांक
स्थान
संपर्क व्यक्ति
दूरध्वनी
३० जुलै
औरंगाबाद नर्सिंग कॉलेज
घोडे पाटील
९४२३ ०३१ ५७७
१ ऑगस्ट
बाएफ रिसर्च फाऊंडेशन, वारजे, पुणे
एस.ई. पवार
०२०-२५२३ १६६१
३ ऑगस्ट
छत्रपती कृषी महाविद्यालय, ओरोस, सिंधुदुर्ग
डॉ. सावंत
९४२२ ६३२ ९९१
९ ऑगस्ट
निसर्ग शाळा प्रकल्प, बेसा, नागपूर
विजय घुगे
९४२२ ८०१ ९६१
११ ऑगस्ट
कुणबी समाज मंगल कार्यालय, शेगाव
डॉ. वानखेडे
९८९० १२४ ९७०

(नांदेड विभागाची कार्यशाळा दिनांक २७ जुलै रोजी होती. श्री. अमित कुलकर्णी यांच्याशी ९०९६ ५९५ ७४९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकता.)

0 प्रतिक्रिया:

Post a Comment