बाएफ तर्फे तरुणांसाठी स्पार्क फेलोशिप

कृषि विकास, शाश्वत जिविका, पर्यावरण संवर्धन व अन्य संबंधित क्षेत्रात गेली चार दशके काम करणार्‍या बाएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाऊंडेशन या विख्यात संस्थेतर्फे तरुणांसाठी स्पार्क फेलोशिप जाहीर करण्यात आली आहे. एक वर्ष कालावधीच्या या फेलोशिप अंतर्गत सहभागींना १) जैवविविधता / पर्यावरण विज्ञान, २) शिक्षण व ३) जैव तंत्रज्ञान या विषयांवरील प्रकल्पांत काम करण्याची संधी मिळेलच, परंतु त्यासोबतच विशेष तयार केलेल्या अभ्यासक्रमासह कार्यानुभव व संबंधित विषयातील तज्ञांचे मार्गदर्शनही यात अंतर्भुत आहे.

निवड झालेल्या सहभागींना प्रति महिना रु.७५०० चे विद्यावेतन दिले जाईल. तसेच बाएफतर्फे निवासाची व कार्य संबंधित प्रवासाची व्यवस्था करण्यात येईल. आवश्यकता भासल्यास प्रकल्पाच्या गरजेनुसार रु.३०,००० अतिरिक्त निधी उपलब्ध करुन दिला जाईल.

पात्रता: कोणीही व्यक्ति जी,
वर उल्लेख केलेल्या विषयांच्या संदर्भात सामाजिक कार्य प्रकल्प हाती घेण्यास उत्सुक असेल.
सृजनशीलतेने शिकण्यास तसेच आपले योगदान देण्यास तयार असेल.
कोणत्याही विद्याशाखेतून पदवी वा पदवी पश्चात शिक्षण पुर्ण केलेले असेल.
२० ते ३० वर्षे वयोगटातील असेल.

ही फेलोशिप पुर्णवेळ एक वर्ष कालावधीची आहे. अधिक माहितीसाठी बाएफच्या संकेतस्थळावर इथे क्लिक करा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०१० आहे.

0 प्रतिक्रिया:

Post a Comment