पिरामल फेलोशिपः सामाजिक उद्यमांत काम करण्याची संधी

व्यवसायासोबतच सामाजिक कामाची आस असणार्‍या प्रज्ञावान तरुणांना पिरामल फाऊंडेशनतर्फे फेलोशिपच्या माध्यमातून भारतातील सर्वोत्तम सामाजिक उद्योजकांसमवेत काम करण्याची संधी मिळणार आहे. हा कार्यक्रम युवकांना सामाजिक प्रभाव टाकणार्‍या उद्योगांमध्ये आपले भवितव्य घडविण्याची संधी मिळवून देणार आहे व त्याच सोबत आघाडीच्या ’बिझनेस स्कूल्स’ मध्ये पुढील शिक्षण घेण्यासाठी मदतही केली जाणार आहे.

या कार्यक्रमाचा कालावधी दोन वर्षांचा असून याची सुरुवात हैदराबाद येथील विख्यात इंडियन स्कूल ऑफ बिझनेस (ISB) मध्ये दहा दिवसांच्या परिचयात्मक कार्यक्रमाने होईल. निवड झालेल्या सहभागींना सामाजिक उद्यमांमध्ये काम करण्यास पाठविले जाईल. या दरम्यान त्यांना विविध कार्यशाळा, चर्चासत्र व संबंधित कार्यक्रमांना उपस्थित राहता येईल. तसेच नामांकित प्राध्यापकांचे व तज्ञांचे मार्गदर्शनही प्राप्त होईल. सहभागींना मासिक रु.२५००० विद्यावेतन देण्यात येईल ज्याद्वारे त्यांना त्यांच्या निवास व जेवणाचा खर्च भागवता येईल. अधिक माहितीसाठी या संकेतस्थळास भेट द्या.

पात्रता:
या फेलोशिपसाठी अर्ज करण्याकरिता पदवी पश्चात किमान दोन वर्षांचा व्यावसायिक अनुभव आवश्यक आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०१० आहे. अर्ज ऑनलाईन भरुन पाठवायचा आहे. पिरामल फाऊंडेशन हा पिरामल हेल्थकेअर या भारतातील नामवंत औषध निर्माण कंपनीचा सामाजिक उपक्रम आहे.

0 प्रतिक्रिया:

Post a Comment