नॅसकॉम सामाजिक नवोन्मेष सन्मान २०११

आयसीटी (म्हणजे इंफॉर्मेशन, कम्युनिकेशन व टेक्नोलॉजी) चा कल्पक व परिणामकारक वापर तुम्ही सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात केला असल्यास नॅसकॉमच्या सामाजिक नवोन्मेष सन्मानासाठी (म्हणजेच ’सोशल इनोवेशन ऑनर्स’ करीता) लगेचच आपले नामांकन पाठवा.

नॅसकॉम या भारतीय सॉफ्टवेअर उद्योगाच्या शिखर संस्थेच्या नॅसकॉम फाउंडेशन या सामाजिक उपक्रमातर्फे सन २००८ पासून सामाजिक परिवर्तनासाठी माहिती, संम्प्रेषण व तंत्रज्ञानाचा (आयसीटीचा) प्रभावी व अनोख्या पद्धतीने उपयोग करणार्‍या सामाजिक संस्था, सरकारी आस्थापने, विद्यार्थी तसेच व्यावसायिक कंपन्यांचा सन्मान केला जातो. यावर्षी व्यक्तीगत पातळीवर तसेच समूहातर्फेही नामांकने पाठविता येतील. नवोन्मेषी संकल्पना ही एखादी प्रक्रीया, कार्यप्रणाली, उत्पादन किंवा या सर्वांचा संयोग असलेली एखादी संकल्पनाही असू शकते. खालील सात प्रवर्गांमध्ये पुरस्कार प्रदान केले जातील.


१. स्वयंसेवी संस्थेद्वारे आयसीटी आधारीत अभिनव उपक्रम
२. व्यापारिक योजनेच्या स्वरुपात आयसीटी आधारीत अभिनव उपक्रम
३. सीएसआरच्या माध्यमातून आयसीटी आधारीत अभिनव उपक्रम
४. शासकीय विभाग वा कंपन्यांद्वारे आयसीटी आधारीत अभिनव उपक्रम
५. बहुविध संबंधित व्यक्तिंची भागीदारी
६. व्यक्ति वा समुहाद्वारे आयसीटी आधारीत अभिनव उपक्रम
७. विद्यार्थ्यांद्वारे आयसीटी आधारीत अभिनव संकल्पना

मागील वर्षी शासकीय प्रवर्गातून कोल्हापूरचे जिल्हाधिकारी श्री.लक्ष्मीकांत देशमुख यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ’सेव्ह दी बेबी गर्ल’ या उपक्रमास पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

या सन्मानाचे मानकरी निवडण्यासाठी नामवंत परिक्षक काम पाहणार आहेत, ज्यामध्ये इंफोसिसचे संस्थापक श्री.नारायण मुर्ती, नॅसकॉमचे माजी अध्यक्ष जयतिर्थ उर्फ जेरी राव व किरण कर्णिक, बिझनेस स्टॅन्डर्डचे अध्यक्ष व संपादकीय संचालक श्री. टी.एन. निनान आणि  प्रख्यात विपणन धोरण तज्ञ व आयआयएम, अहमदाबादच्या नियामक मंडळ सदस्या श्रीमती रमा बिजापूरकर यांचा समावेश आहे. जेनपॅक्ट या आंतरराष्ट्रिय ख्यातीच्या कंपनीने हे पुरस्कार प्रायोजित केले आहेत.

नामांकने पाठविण्याची अंतिम तारिख १ ऑक्टोबर २०१० आहे. विहित नमुन्यातील अर्ज संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी नॅसकॉम फाऊंडेशनच्या संकेतस्थळास येथे भेट द्या.

0 प्रतिक्रिया:

Post a Comment