नव्या सेवासंधी, नवी रचना.

सेवायोगवर काही कारणास्तव आतापर्यंत फारश्या सेवासंधी प्रकाशित करता आल्या नव्हत्या. आता मात्र आठवड्यातून किमान एकदा प्रत्येक शनिवारी विविध संस्थांमधील सेवासंधी नियमित प्रकाशित करण्याचा प्रयत्न राहील. आपल्या संस्थेतील वा माहितीतील संस्थेमधील नोकरी वा स्वयंसेवेच्या विविध संधी सेवायोगकडे कळविण्याची आपणा सर्वांना पुन्हा विनंती आहे.

नोकरीचा मजकूर इंग्लिश मधून मराठीमध्ये भाषांतरीत करताना तपशिलात संदिग्धता राहण्याची शक्यता राहते. म्हणूनच सध्या तरी पदनाम मराठीत देऊन बाकी मूळ मजकूर तसाच इंग्लिश मध्ये ठेवण्यात येईल. परंतु सेवायोग चाचणी आवृत्तीतून (बीटा व्हर्शन) बाहेर पडल्यावर मात्र सर्व मजकूर मराठीतच असण्याचा आग्रह असेल. आता वळूया या आठवड्याच्या सेवासंधींकडे...

0 प्रतिक्रिया:

Post a Comment