सामाजिक संस्थांसाठी प्रचार प्रसिद्धी तंत्र व मुद्रणकलेसंबंधी कार्यशाळा

काम कमी परंतु गवगवा जास्त अशा अनेक तथाकथित एनजीओ आजकाल गल्लोगल्ली सापडतात. मात्र आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहून प्रामाणिकपणे काम करणार्‍या स्वयंसेवी संस्था, आपले कार्य इतरांपर्यंत पोहविण्यात कमी पडताना दिसतात. केवळ ’प्रसिद्धीसाठी प्रसिद्धी’ नव्हे तर आपले कार्य समाजापर्यंत पोहचवून त्यात लोकांचा सहभाग प्राप्त करण्यासाठी सामाजिक कार्याची योग्य ती प्रसिद्धी करणे आवश्यक आहे. म्हणूनच रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या संस्थेने सामाजिक संस्थांमधील प्रचार प्रसिद्धी व मुद्रण विषयांत लक्ष घालणार्‍या कार्यकर्त्यांसाठी दि.३० व ३१ ऑक्टोबर २०१० रोजी, मुंबईत एका दोन दिवसीय अनिवासी कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

या शिबिरात सहभागींना प्रचार व प्रसिद्धी विषयक धारणा, मुदण-दृकश्राव्य माध्यमे, इंटरनेटचा प्रभावी वापर, चित्रफीत, सादरीकरण, प्रचार साहित्य आदी विषयांवर व्यवसायिक तज्ञांकडून सखोल मार्गदर्शन केले जाईल.

कार्यशाळेची अधिक माहिती प्रबोधिनीच्या संकेतस्थळावर येथे पाहता येईल. कार्यशाळेसाठी नावनोंदणीची अंतिम तारीख २० ऑक्टोबर २०१० असून ०२२-२४१३६९६६ या दूरध्वनी क्रमांकावर श्वेता जोशी यांच्याशी किंवा ९८३३५ ०९२२२ या क्रमांकावर मिलिंद बेटावदकर यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधू शकता.

0 प्रतिक्रिया:

Post a Comment