स्वयंसेवी संस्थांसाठी बचत गट संदर्भात क्षमता वर्धन कार्यशाळा

सोस्वा ट्रेनिंग अ‍ॅन्ड प्रमोशन इंस्टिट्यूट या पुणे स्थित स्वयंसेवी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी काम करणार्‍या संस्थेतर्फे 'स्वयंसेवी संस्थांसाठी बचत गट संदर्भात क्षमता वर्धन' या विषयावर दिनांक २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०१० दरम्यान पुणे येथे चार दिवसीय निवासी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत खालील विषयांवर तज्ञ व्यक्तिंकडून मार्गदर्शन केले जाईल.
  • भारतातील सुक्ष्म वित्त (मायक्रो फायनान्स) क्षेत्राची ओळख
  • विविध स्वयंसेवी संस्था व बचत गटांचे अनुभव
  • ग्रामीण गरिबांचे बचत गटांद्वारे सक्षमीकरण - संकल्पना व आढावा
  • बचत गटांची बांधणी - सदस्य निवडीचे निकष, समूह विकासाच्या पायर्‍या व बचतीची गरज
  • बचत गट बैठकीकरीता विषयसूची ठरविणे व बैठकीचे संचालन करणे.
  • प्रोत्साहक, क्षेत्र कार्यकर्ते व समन्वयकांची भूमिका व कार्य.
  • अंतर्गत कर्जवाटप पद्धती, सदस्यांना कर्ज वाटपाचे निकष
  • बॅंकेशी जोडणी - पद्धत, गटांचे वर्गीकरण, परिक्षण व मुल्यमापन
  • विविध नोंद वह्यांची व्यवस्था, गटाचे प्रचालन व उद्योजकता
  • सहभागात्मक ग्रामीण मुल्यांकन (पीआरए) तंत्र

सदर कार्यशाळेस येणार्‍या प्रतिनिधींना रु. ५०० पर्यंत प्रवास खर्चाचा परतावा मिळू शकतो.
वेळ: चारही दिवस स.९.३० ते सा.५.३०

अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक: ०२०-२६६८४६४१ / २६६९६२१२ / २६६८७९०० वर संपर्क साधावा.
संपर्क व्यक्ती: नसरिन तांबोळी

स्थान:
सोस्वा ट्रेनिंग अ‍ॅन्ड प्रमोशन इंस्टिट्यूट,
म्हाडा व्यापारी संकुल, पहिला माळा,
एमएचबी वसाहत, येरवडा, पुणे - ४११ ००६.

इमेल: stapi@vsnl.net किंवा society_2007@dataone.in
फॅक्स: ०२०-२६६९५६४६

0 प्रतिक्रिया:

Post a Comment