एडेलगिव्ह सामाजिक नवोन्मेष सन्मान २०११

एडेलगिव्ह फाऊंडेशन या सामाजिक उपक्रमातर्फे गेली दोन वर्षे महिला व मुलींच्या सक्षमीकरणासाठी अभिनव उपक्रम राबविणार्‍या सामाजिक संस्थांना एडेलगिव्ह सामाजिक नवोन्मेष सन्मान देऊन गौरविण्यात येते. विजेते व उपविजेत्यांना रुपये ५० लाखांची रक्कम पुरस्कार स्वरुपात दिली जाते. त्याचबरोबर या संस्थांच्या क्षमतावर्धनासाठीही सहाय्य केले जाते. खालील पाच गटांमध्ये पुरस्कार दिले जातात.
  1. शिक्षण: स्त्रियांना शिक्षणाची किंवा गुणवत्तापुर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देणारी अभिनव संकल्पना.
  2. आरोग्य व कल्याण: स्त्रियांचे आरोग्य व एकूणच कल्याणाबद्दल जागृती निर्माण करणारी अभिनव संकल्पना.
  3. शासन: उपलब्ध वैधानिक रचनेमध्ये महिलांना प्रतिनिधित्व करण्यासाठी तयार करणारी अभिनव संकल्पना.
  4. सामाजिक-सांस्कृतिक हक्क: सामाजिक व सांस्कृतिक आव्हाने पार करण्यासाठी महिलांना मदत करणारी अभिनव संकल्पना.
  5. उपजिविका: अशी अभिनव संकल्पना जी महिलांना त्यांचे उत्पन्न वाढविण्यास मदत करते किंवा रोजगाराची संधी उपलब्ध करुन देते.
विजेत्यांच्या निवडीमध्ये पारदर्शिता राहण्यासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्था (TISS) मुल्यमापन संस्था म्हणून व अर्नेस्ट अ‍ॅंड यंग प्रा. लि. प्रक्रिया सल्लागार म्हणून सहभागी होणार आहेत. संस्था किती लहान वा मोठी आहे यापेक्षा तिने संबंधित उपक्रम किती नाविन्यपुर्णतेने राबविला आहे हा पुरस्कार निवडीसाठी महत्त्वाचा निकष असेल. पुरस्कारांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ नोव्हेंबर २०१० आहे. अधिक माहितीसाठी संस्थेच्या संकेतस्थळास भेट द्या. तसेच एकता छेडा यांच्याशी २२-४३४२ ८२९६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकता. अर्ज इंग्लिश व हिंदी भाषेत उपलब्ध आहेत.

एडेलगिव्ह सामाजिक नवोन्मेष सन्मान हा भारतातील प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये गणला जातो. एडेलगिव्ह फाऊंडेशन हा एडलवाईस या भारतातील नामांकित वित्तीय कंपनीचा सामाजिक उपक्रम आहे.

(आपल्या माहितीत वरील ५ पैकी एखाद्या विषयांत अभिनव उपक्रम राबविणारी संस्था असल्यास कृपया ही पोस्ट त्यांच्यापर्यंत पोहचवून त्यांना अर्ज करण्यास प्रोत्साहित करा).

0 प्रतिक्रिया:

Post a Comment