स्वयंसेवी संस्थांचा स्वैच्छिक कार्य संगम

विकासाचे मोठे प्रकल्प म्हणजे पर्यावरणाला मारकच असतात तर पर्यावरणवादी नेहमीच विकास प्रकल्पांना खोडा घालतात असे सर्वसामान्य चित्र बरेचदा दोन्ही बाजूंकडून रंगविले जाते. अनेकदा स्वयंसेवी क्षेत्रातील कार्यकर्त्यांनाही विकास की पर्यावरण अशा द्विधा परिस्थितीस सामोरे जावे लागते. ’पर्यावरणाभिमुख विकास’ ही संकल्पना घेऊन रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने येत्या २१ व २२ डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे देशभरातील स्वयंसेवी संस्थांचा ’स्वैच्छिक कार्य संगम’ मेळावा आयोजित केला आहे.

स्वयंसेवी क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे अनुभव, सामाजिक प्रयोग यांची देवाण घेवाण तसेच आव्हानांची अन्य कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्यासाठी गेल्या २ वर्षांपासून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी देशभरातील स्वयंसेवी संस्थांचा ’स्वैच्छिक कार्य संगम’ मेळावा आयोजित करीत आहे.

संयुक्त राष्ट्र संघटनेने ठरविलेल्या ’मिलेनियम डेव्हलपमेंट गोल’ पैकी ’शाश्वत विकास’ या उद्दिष्टाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या यावर्षीच्या स्वैच्छिक कार्य संगमास "प्रकृति - २०१०" हे साजेसे नाव दिले असून त्यात पर्यावरण स्नेही जीवनशैली, आजीविका व उर्जेचे स्त्रोत, इत्यादी विषयांवर विचार मंथन होणार आहे.

या स्वैच्छिक कार्य संगमात सहभागी होण्यासाठी नाव नोंदण्याची अंतिम तारीख ८ डिसेंबर २०१० आहे. अधिक माहिती येथे उपलब्ध आहे. तसेच प्रबोधिनीचे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी श्री. मिलिंद बेटावदकर यांच्याशी ९८३३५०९२२२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकता.

0 प्रतिक्रिया:

Post a Comment