एसबीआय युथ फॉर इंडिया फेलोशिप

भारताच्या उन्नतीमध्ये आपले सक्रिय योगदान देऊ इच्छिणार्‍या ध्येयवादी तरुणांसाठी स्टेट बॅंक ऑफ इंडियाने युथ फॉर इंडिया नावाने एक वर्ष कालावधीचा पुर्णवेळ फेलोशिप कार्यक्रम आखला आहे. या अंतर्गत निवड झालेल्या युवकांना ग्रामीण भागात काम करणार्‍या प्रतिष्ठित व अनुभवी स्वयंसेवी संस्थांसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. एकूण ५० युवकांची या फेलोशिप करिता निवड करण्यात येणार असून त्यांना नेतृत्व व समुह उभारणी, संसाधन व्यवस्थापन, प्रभाव विश्लेषण, अभिलेखन, इत्यादी विषयांवर विशेष प्रशिक्षण देण्यात येईल.

महाराष्ट्रासहित अन्य ६ राज्यांतील प्रकल्पांवर काम करण्यासाठी युवकांना पाठविण्यात येईल. या प्रकल्पांमध्ये जलव्यवस्थापन, महिला सक्षमीकरण, पर्यावरण, जैवतंत्रज्ञान, सागरतटीय संशोधन व विम्यासहित अन्यही विषय आहेत ज्यावर हे उमेदवार काम करतील.

स्टेट बॅंकेतर्फे या युवकांना मानधन म्हणून दरमहा रु. १२,००० देण्यात येतील. तसेच त्यांच्या निवासाची व्यवस्था संबंधित स्वयंसेवी संस्थेमार्फत केली जाईल.

आज सर्वच उद्योगांत ग्रामीण बाजारपेठ महत्त्वाची मानली जाते. या युवकांना थेट ग्रामीण जीवनाशी एकरुप होऊन काम करण्याची संधी मिळणार आहे. हा अनुभव पुढे त्यांना त्यांच्या व्यवसायिक जीवनात नक्किच उपयोगी ठरेल.

मार्च २०११ पासून सुरु होणार्‍या या फेलोशिपसाठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०११ आहे. २१ ते ३५ वयोगटातील पदवीधर युवक / युवतींना यासाठी अर्ज करता येईल. अधिक माहितीसाठी युथ फॉर इंडियाच्या संकेतस्थळास भेट द्या.

इमेल व फीडरिडरद्वारे वाचणार्‍या वाचकांनी प्रतिक्रिया देण्यासाठी इथे क्लिक करा.

0 प्रतिक्रिया:

Post a Comment