काही प्रायोगिक बदल

गेल्या काही दिवसांपासून सेवायोगच्या वाचकांकडून वेगवेगळ्या लेखांवर अधिकाधिक प्रतिक्रिया येत आहेत. परंतु या प्रतिक्रिया सेवायोगच्या इमेल खात्यामध्ये येत आहेत. कदाचित सेवायोगचे बहुतांश वाचक हे इमेलद्वारे किंवा फिडरिडरद्वारे लेख वाचत असतात. त्यामुळे थेट सेवायोगच्या संकेतस्थळावर येऊन प्रतिक्रिया नोंदविणे होत नसावे. बर्‍याच प्रतिक्रियांमध्ये लेखाशी संबंधित अधिक माहिती दिलेली असते किंवा वेगळ्या दृष्टिकोनातून मतं मांडलेली असतात. अशी माहिती किंवा मतं अन्य वाचकांना कळल्यास संवादाची प्रक्रिया सुरु होऊन त्यावर चर्चा घडू शकते.

म्हणूनच लेखावर प्रतिक्रिया देणे सोपे व्हावे यासाठी आजपासून डिस्कस ही ’प्रतिक्रिया प्रणाली’ सेवायोगवर प्रायोगिक तत्त्वावर सुरु केली आहे. प्रत्येक लेखा खालील प्रतिक्रियेच्या चौकटीमध्ये आपली प्रतिक्रिया लिहून किंवा अन्यत्र टंकित केली असल्यास डकवून पोस्ट अ‍ॅज (Post As) वर क्लिक करा. इथे आपण आपला कोणताही इमेल वापरुन किंवा अगदी आपले फेसबूक वा ट्विटर खाते वापरुनही प्रतिक्रिया नोंदवू शकता. परंतु प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी मात्र आपल्याला संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक आहे. मराठीमध्ये टंकन करण्यासाठीचे पर्याय जाणून घेण्यासाठी सेवायोगच्या मदत पृष्ठाला भेट द्या. मराठी टंकन शक्य नसल्यास इंग्लिशमध्येही प्रतिक्रिया लिहू शकता.

सेवायोग अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहचण्यासाठी फेसबूक पृष्ठ तयार केले आहे. आपण या पृष्ठाशी अजून जोडले गेले नसल्यास इथे क्लिक करुन लाईक बटनावर क्लिक करा. जे याआधी जोडले गेले आहेत ते आपल्या फेसबूक खात्यातून या पृष्ठावर जाऊन "सजेस्ट टू फ्रेंड्स" वर क्लिक करुन आपल्या मित्रांना आमंत्रण देऊ शकतात. प्रत्येक लेखाखाली फेसबूकचे ’लाईक’ बटन दिले आहे. लेख आवडल्यास त्यावर नक्की क्लिक करा. आवडला नसल्यास मात्र इमेल पाठवा :-)  सेवायोगवर अन्य काही बदल आपणास अपेक्षित असल्यास जरुर कळवा.

इमेल वा रिडरद्वारे लेख वाचणार्‍यांनी प्रतिक्रिया देण्यासाठी इथे क्लिक करा

0 प्रतिक्रिया:

Post a Comment