भारत सरकारतर्फे माहिती अधिकार फेलोशिप

भारत सरकारच्या केंद्रिय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालयाकडे माहिती अधिकार राबविण्याची जवाबदारी आहे. या विभागामार्फत माहिती अधिकाराचा अभ्यास व त्यासंदर्भात संशोधन करण्यासाठी पाच लघुकालिक फेलोशिप देण्यात येत आहेत. "माहिती अधिकाराच्या प्रभावी अंमलबजावणीतून शासनामध्ये पारदर्शिता व उत्तरदायित्व सुधारणे" या कार्यक्रमांतर्गत या फेलोशिप देण्यात येत आहेत.

२५ ते ४० वयोगटातील व्यवसायिक जे माहिती अधिकार संशोधन व प्रशिक्षण, पत्रकारिता किंवा समाजाच्या अन्य क्षेत्रात कार्यरत आहेत ते या फेलोशिपसाठी अर्ज करु शकतात. अर्जदार व्यक्ति तिच्या संबंधित क्षेत्रातील लौकिक प्राप्त असावी. तसेच माहिती अधिकाराशी संबंधित कामाचा किमान अनुभव असावा. त्याचसोबत संशोधनात्मक अभियोग्यता असणे अपेक्षित आहे.

ही फेलोशिप ३ महिने कालावधीची असून निवडलेल्या उमेदवारांस २ लाखांचे विद्यावेतन देण्यात येईल. तसेच प्रवास, पुस्तकं, संशोधन साहित्य, छपाई, इत्यादी करीता रू.५० हजारांचे वेगळे अनुदान देण्यात येईल.

अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ जानेवारी २०११ सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. अधिक माहितीसाठी हा दुवा पहावा.

0 प्रतिक्रिया:

Post a Comment