पाणी विषयात काम करणार्‍या कार्यकर्त्यांसाठी कार्यशाळा


आग विझविणारे पाणी आग लावू शकते का असे जर कोणी विचारले तर सध्या तरी याचे उत्तर हो असेच द्यावे लागेल. एकीकडे वाढती लोकसंख्या व दुसरीकडे पाण्याची होणारी अक्षम्य हेळसांड व गैरवापर असे विरोधाभासी चित्र पहावयास मिळते. दरवर्षी २२ मार्च हा जागतिक जलसंपत्ती व्यवस्थापन दिवस (World Water Day) म्हणून पाळला जातो. शहरी पाणीव्यवस्थापनासमोरील आव्हाने ही यावर्षीच्या जलदिनाची संकल्पना आहे. यादृष्टीने शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था व सामान्य नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी पुणे स्थित सेवावर्धिनी, इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स, अ‍ॅक्वाडॅम व भुजल विकास सर्वेक्षण यंत्रणा (महाराष्ट्र राज्य) यांनी संयुक्तपणे दिनांक २२ मार्च २०११ रोजी शिवाजीनगर, पुणे येथे एका दिवसभराच्या कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

शहरातील जलव्यवस्थापनाच्या दृष्टीने पाणी वापराचे योग्य नियोजन, पाण्याचा मर्यादित वापर, सांडपाण्याचे शुद्धिकरण व पुनर्प्रक्रिया करुन फेरवापर, नैसर्गिक जलस्त्रोतांचे संरक्षण, वर्षाजल साठवणूक व पुनर्भरण तसेच नवीन जलस्त्रोतांचा शोध, इत्यादी विषयांवर संबंधित तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. याचसोबत ग्रामस्तरीय पाण्याच्या सुरक्षितेसाठी भूजल सर्वेक्षण यंत्रणेने तयार केलेल्या कार्यपुस्तिकेचा अभ्यासही या कार्यशाळेत केला जाईल. शहरी व ग्रामीण पाणी नियोजनाचा आराखडा तयार करणे ही या कार्यशाळेची परिणती असेल. म्हणूनच शहरी वा ग्रामीण पाणी समस्येवर काम करणार्‍या कार्यकर्त्यांसाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयोगी ठरणार आहे. प्रसिद्ध जलतज्ञ डॉ. माधवराव चितळे या कार्यशाळेचा समारोप करणार आहेत.

कार्यशाळेची वेळ सकाळी ११ ते सायं. ८ वाजे पर्यंत असून शुल्क केवळ रुपये ५० इतके आहे. कार्यक्रमाचे स्थान इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स, शिवाजीनगर, पुणे येथे आहे. अधिक माहिती व सहभागी होण्यासाठी सेवावर्धिनीचे प्रकल्प समन्वयक श्री. प्रविणकुमार शिंदे यांच्याशी ९०११९९२७९९ किंवा ०२०-२४४३३६०६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

0 प्रतिक्रिया:

Post a Comment